Friday, 19 July 2013

मोडेन पण वाकणार नाही….

ठाकलो मी उभा इथे, रोऊन आज पाय,
झाले काहीही तरी इथून आता हलणार नाही
येऊ देत मग तुझे हत्ती, घोडे, सैन्य आणि तोफा,
आता मोडेन पण वाकणार नाही….

आहेस वितभर, गाजावाजा करतोस गावभर
सैन्य तर तुझे मूठभरच
भुंकण्याला त्यांच्या मी भीत नाही,
अरे वाघ आहे वाघ, आधी फडशा पाडतो
मग डरकाळी फोडतो

तुला आसमान दाखविल्याशिवाय
जिवंत परत जाणार नाही
आता मोडेन पण वाकणार नाही…।

पिलांना तुझ्या बजावून ठेव, उद्या मी वाचता कामा  नये
पिलांना तुझ्या बजावून ठेव, उद्या मी वाचता कामा  नये
कारण शपथ घेतलीस "उसको जिंदा नाही छोडूंगा "
पण चुकून जर उद्यान मी वाचलो
तर तुझ्या घरात घुसून "तेरा सर कलम कर दुंगा "
मरणाला तर मी तसाही भीत नाहीच

तुला पाणी पाजल्याशिवायच
इथून परत जाणार नाही
आता मोडेन पण वाकणार नाही…

टिळा भवानी मातेचा
आणि घोट तुझ्या नरडीचा,
घोट तुझ्या नरडीचा नाहीतर
हा जन्म बायलीचा
हे आयुष्य फडफडतं,
हे रक्त सळसळतं
फक्त या स्वराज्याचं
आणि म्हणूनच हि जिद्द!

No comments:

Post a Comment